This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील वडझिरे परिसरातील कृष्णतारा पेट्रोलपंपाचे जवळील वळणावर झालेल्या टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातामधे देवीभोयरे येथील तरुण जागीच ठार झाला.
पारनेर-बेल्हे रस्त्यावर टाटा टेम्पो (एमएच ४२ टी-१०१३) जात होती. समोरून येणाऱ्या मोटरसायकलची (एमएच १६, एडी २७३९) आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये देवीभोयरे (माळवाडी) येथील प्रमोद किसन मुळे (वय ३७) हा जागीच ठार झाला.
प्रमोद हा सोमवारी दुपारी अळकुटीकडून देवीभोयरेकडे मोटरसायकलने जात होता. पारनेरकडून बेल्ह्याच्या दिशेने येणारा टाटा टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, हेड काॅन्स्टेबल शंकर रोकडे व पोलिस काॅन्स्टेबल सचिन देवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पंचनाम्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयामधे पाठवण्यात आला.त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com