मालेगावमधील कोरोना रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात येणार ? जाणून घ्या सत्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- मालेगाव व शेजारील काही तालुक्‍यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या दिवसागणीक वाढत आहे. त्‍यामुळे तेथील रुग्ण अन्‍य ठिकाणच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्‍याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमिवर मालेगाव येथील रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात आणि विलगीकरण कक्षात दाखल करण्‍यात येणार असल्‍याची अफवा पसरल्‍यामुळे शिर्डी शहरासह परिसरामधील गावांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान मालेगाव आणि इतर तालुक्‍यांमधील कोरोना रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात किंवा विलगीकरण कक्षात येणार नसल्‍याने स्‍थानिक नागरीकांनी कोणत्‍याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच घाबरुन जावू नये असे आवाहन माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे.

समाज माध्‍यमांमधुनही वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्‍या. याबाबत शिर्डी शहरातील कार्यकर्ते आणि नागरीकांनीही आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याशी संपर्क साधला.

या संदर्भात आ.विखे पाटील यांनी जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करुन मालेगाव व इतर तालुक्‍यातील रुग्‍णांसाठी मालेगाव या ठिकाणी व नाशिक सामान्‍य रुग्‍णालयासह अन्‍य ठिकाणी पुरेशी व्‍यवस्‍था असल्‍याने शेजारील इतर जिल्‍ह्यांमध्‍ये व्‍यवस्‍था करण्‍याची आवश्‍यकता नाही.

शिर्डी येथील रुग्‍णालय हे कोविड रुग्‍णालय म्‍हणून प्रशासनाने घोषित केलेले नाही. शिर्डी येथे फक्‍त संस्‍थात्‍मक विलगीकरण कक्ष उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.

त्‍यामुळे मालेगाव अथवा इतर ठिकाणचे कोरोना रुग्‍ण येथे आणणे हे संयुक्‍तीक होणार नाही ही बाब त्‍यांनी जिल्‍हाधिका-यांच्‍या निदर्शनास आणुन दिली.

या संदर्भात जिल्‍हाधिका-यांनीही इतर जिल्‍ह्यातील कोणतेही रुग्‍ण शिर्डी येथे आणले जाणार नाहीत याबाबत आश्‍वासित केले असल्‍यामुळे नागरीकांनी कोणत्‍याही अफवा व चर्चांवर विश्‍वास ठेवू नये, घाबरुन जावू नये असे आवाहन आ.विखे पाटील यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment