Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

आता प्रसूतीपूर्वी प्रत्येक महिलेची होणार कोरोना टेस्ट

0

रांची कोरोनाव्हायरसचा वाढता धोका पाहता सर्व प्रेग्ननंट महिलांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. झारखंड राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे.

त्यामुळे राज्यातील 50 हजारपेक्षा अधिक प्रेग्ननंट महिलांची डिलीव्हरीपूर्वी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. पुढे जाऊन काही क्रिटिकल परिस्थिती उदभवू नये यासाठी सरकारनं योजना तयार केली आहे.

मे महिन्यात राज्यात 51,933 गरोदर महिलांची प्रसूती होणार आहे. या सर्वांची सुरुवातीला कोरोना टेस्ट केली जाईल. रांचीतील नामकुमपासून ही टेस्ट सुरू करण्यात आली आहे.

रांचीतील रिम्स आणि सदर रुग्णालयात बाळांना जन्म दिल्यानंतर काही महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. ज्यामुळे त्यांची प्रसूती करणारे डॉक्टर आणि नर्सना क्वारंटाइन व्हावं लागलं.

शिवाय प्रसूती विभागही काही दिवस बंद ठेवावा लागला. यानंतर खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालयांनाही गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही. त्यामुळे अशा परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी ही उपाययोजना आहे.

आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “राज्यातील सर्व गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती होणं ही सरकारची जबाबदारी आहे.

त्यामुळे या महिन्यात बाळाला जन्म देणाऱ्या सर्व मातांची प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. राज्यभरात ट्रू नेट मशीन लावण्याचीही योजना आहे, जेणेकरून प्रसूतीवेळी कोणती समस्या उद्भवणार नाही.

या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व गर्भवती महिलांची कोविड-19 टेस्ट केली जाई, जेणेकरून आपात्कालीन परिस्थितीत नॉर्मल किंवा सिझेरियन प्रसूतीत कोणती समस्या उद्भवू नये”

li