अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून ऑनलाइन पासची सुविधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : अंत्यसंस्कारांच्या पाससाठी होणारी अडचण दूर करण्यासाठी महापालिका ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. शहरातील एखाद्या रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच ठिकाणाहून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

जर राहत्या घरीच मृत्यू झाल्यास सध्या नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांचे मृत्यूचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु ही कागदपत्रे स्कॅन करावी लागतील. त्यानंतर त्यांना ऑनलाइन मयत पास मिळू शकतो; पण त्याबाबत अद्याप चाचपणी सुरू असल्याचे श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.

पुण्यात साधारणतः महिनाभरात सव्वादोन हजार नागरिकांचा मृत्यू होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेचा ‘मयत पास’ आवश्यक असतो. सध्या पालिकेची रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, विश्रामबागवाडा, वैकुंठ स्मशानभूमी येथे पास मिळतो;

परंतु, यातील अनेक ठिकाणी रात्रीनंतर पास मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे मयत पास ऑनलाइन स्वरूपात देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. ऑनलाइन पासमुळे पालिकेचे मृत्यू नोंदणी कामही गतीने पूर्ण होणार असून,

ृमृत्यू दाखला/प्रमाणपत्र मिळण्यासाठी सध्या लागणारा २१ दिवसांचा कालावधी कमी होऊ शकतो, असा दावा महापालिकेचे विद्युत विभागप्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी केला.

Leave a Comment