धक्कादायक : तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अकोले तालुक्यातील विठा भागात राहणारी शेतकरी तरुणी राणी योगेश आवारी , वय ३० शेतात गेली असता ती घरी आली नाही तिचा शोध घेतला असता डॉक्टर भोकनळ यांच्या विहिरीजवळ चप्पल दिसून आली .

तेव्हा विहीरीत गळ टाकून राणी आवारी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉक्टरकडे नेले मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली होती .

मयत राणी या तरुणीचे पती योगेश अशोक आवारी यांनी राजूर पोलिसात खबर दिल्यावरुन अमनं . ११ नोंदविण्यात आला असून पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

राणी योगेश आवारी ही तरुणी विहिरीत पडली ? का तिने आत्महत्या के ली ? तिच्या चपला विहिरीच्या काठावर कशा ? या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .

दरम्यान राणी योगेश आवारी या तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने तो काढण्यासाठी अनेकांनी मदत केली . तिच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment