Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगरमध्ये ड्रायव्हरला झाली कोरोनाची लागन,शहरातील हा भाग होणार सील ?

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  अहमदनगर शहर कोरोनामुक्त झाले असताना पुन्हा त्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे नगरकरांची काळजी वाढली आहे.दोन दिवसांत अहमदनगर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे

आज सकाळी (बुधवारी) जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आला होता.

ही व्यक्ती ड्रायव्हर असून त्याने पुणे-मुंबई प्रवास केला होता, या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले

या कोरोना बाधित रुग्णाची कॉटेक्ट हिस्ट्री मोठी असल्याची माहिती समोर येत आहे, धक्कादायक माहिती म्हणजे तो अत्यावश्यक सेवेचा पास मिळालेल्या वाहनांवर होता. मुंबई, पुणे असा त्याचा प्रवास झाला आहे.

त्याच्या संपर्कातील सुमारे 60 जणांना तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. सारसनगर हा नगर शहरातील महत्त्वपूर्ण भाग आहे.येथे मोठी नागरी वसाहत आहे.

बाधित रुग्ण आढळलेल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यातून अफवांचे पेव फुटले आहे. हा बाधित रुग्णाच्या संपर्कातील जिल्हा प्रशासनाने सुमारे 60 जण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

बाधिताच्या नातेवाईकांना महापालिकेच्या प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. या रुग्णाने सुरूवातीला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही तपासणी होणार आहे.

सारसनगरमधील बाधित रुग्ण हा चालक आहे. तो बर्‍याच ठिकाणी फिरला असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोधाचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

संबंधित रुग्ण राहत असलेला सारसनगर हा परिसर मार्केट यार्डजवळ आहे. त्यामुळे लवकरच हा परिसरही सील करण्याची शक्यता आहे.व आगामी काळात या परिसरात उपाययोजना अधिक कठोरपणे होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button