Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

लॉकडाऊनमधील लग्नाची गोष्ट …आणि ते वधू-वर तोंडाला मास्क लाऊन चढले बोहल्यावर !

0

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- जगासह देशात कोरोना धुमाकूळ घालत आहे. उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, प्रवास, बाजारपेठा, हॉटेल, मॉल, थियेटर्स बंद पडून संपुर्ण देश ठप्प असून, लॉकडाऊनचा तीसरा टप्पा सुरु आहे.

या लॉकडाऊन काळात लोक अक्षरश: घरात डांबले गेले. ऐन लग्नसराईत अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे अनेक लग्नाळूंच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मात्र लॉकडाऊन वाढत असताना मोजक्या व्यक्तींसह अनोख्या पध्दतीने विवाह साजरे होताना दिसत आहे.

असाच प्रज्ञा दहिवळकर व अमोल अंबिलवादे यांचा विवाह हौस-मौज, मेजवान्या, पाहुणेरावळे, बँड बाजा, वरात यांच्याशिवाय पण तरीही आनंदात निंबळक (ता. नगर) एमआयडीसी मध्ये पार पडला.

नातेवाईकांनी ऑनलाईन अक्षता वाहून शुभेच्छा व आशिर्वाद दिले. धर्मराज दहिवळकर यांची कन्या प्रज्ञा दहिवळकर ही एल अ‍ॅण्ड टी मध्ये एचआर आहे.

तर नवी मुंबई येथील डॉ.चंद्रकांत अंबिलवादे यांचा मुलगा अमोल अंबिलवादे मेन्स स्पाईन या कंपनीत उप व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. यांचा विवाह लॉकडाऊनपुर्वी ठरविण्यात आला.

लग्नाची संपुर्ण तयारी झाली. लग्नाची दिनांक व वेळ देखील ठरविण्यात आली. लगीन घटिका जवळ येताना अचानक कोरोनाचे संकट उभे राहिल्याने हा विवाह पुढे ढकलण्यात आला.

मात्र लॉकडाऊन वाढत असताना दोन्ही कुटुंबीयांनी ही प्रेमाची रेशीम गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. नुकताच प्रज्ञा व अमोलचा विवाह धर्मराज दहिवळकर यांच्या निंबळक एमआयडीसी येथील राहत्या घरी आनंदात पार पडला.

तोंडाला मास्क लाऊन वधू-वर बोहल्यावर चढले. फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नासाठी 20 व्यक्तींसह डॉ.चंद्रकांत अंबिलवादे, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, अ‍ॅड. राम दहिवळकर, तलाठी हेमंत डहाळे, जयंत नागरे

आदि उपस्थित होते. मात्र हा विवाह अनुभवण्यासाठी वर-वधूचे नातेवाईक व्हिडीओ कॉल आणि फेसबुक लाईव्हवर मोठ्या संख्येने हजर होते. नातेवाईकांनी ऑनलाईनच अक्षता वाहून वधू-वरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

li