Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अवघ्या एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारातील उज्ज्वला चव्हाण हिच्या घरी बुधवारी रात्री ही घटना घडली.

मागील भांडणातून आरोपींनी उज्ज्वला हिच्या एक महिन्याच्या अर्णवच्या डोक्‍यात दगड घालून त्यास ठार केले.

अर्णव अभिषेक चव्हाण (वय 1 महिना) असे मृत बाळाचे नाव आहे.

दरम्यान उज्ज्वला अभिषेक चव्हाण हिने सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसार

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी यानंतर दोन आरोपींना अटक केली असून

आदिक काळे व समीर काळे अशी त्यांची नावे आहेत, तर आरोपी किशोर चव्हाण पसार झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button