Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर शहरात बुलेटने घेतला आजोबांचा जीव !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर शहरात दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

बबन भानुदास तोडमल ( वय- ६० रा . बुन्हाणनगर नगर ) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

ही घटना रविवारी ( दि १० ) सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर- बुन्हाणनगर रोडवरील बोचरी नाक्याजवळ घडली .

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .

लंकाबाई बबन तोडमल ( वय- ५५ रा बुन्हाणनगर , नगर ) यांनी फिर्याद दिली आहे .

मयत तोडमल पत्नीसह त्यांच्या दुचाकीवर ( क्र . एमएच- १ बीपी १२६१ ) बुहाणनगरवरून जात असताना

त्यांच्या दुचाकीला बुलेटने धडक दिली . यामध्ये बबन तोडमल मयत झाले .

त्यांच्या पत्नी लंकाबाई तोडमल यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून

बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button