आता राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण राज्यात आहेत. याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक झाली.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

१७ मे नंतर लॉकडाऊनच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरु होती. अर्थचक्र सुरु रहावं यासाठी राज्यातील आणखी किती उद्योग सुरु करता येतील याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन १७ मे नंतर ३१ मे पर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली. लवकरच सरकार याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करणार आहे.

मात्र हा लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरू राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियम टाकून काही उद्योगधंदे सुरू केले आहेत.

आणखी काही उद्योगधंदे सुरू करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही व्यवहार सुरू करण्याची घोषणाही लॉकडाऊन वाढवताना केली जाऊ शकते.

ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment