This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- सध्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहानमधून झाला. भारतात तर चांगलाच धुमाकूळ या आजाराने घातला आहे. जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.
मात्र कोरोनाचे एकही नवीन प्रकरण न सापडल्यानंतर वुहाननं तब्बल 76 दिवसांनी लॉकडाऊन हटवला. मात्र आता पुन्हा कोरोनानं वुहानमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळं आता वुहानमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. यासाठी आता एक खास प्लॅन तयार करण्यात आला असून यामध्ये शहरातील प्रत्येक भागात 10 दिवसांत कोरोना चाचणी आणि सामग्रीची तयारी करावी लागणार आहे.
दरम्यान ही चाचणी कधी पासून सुरू केली जाणार, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सध्या वुहानमध्ये 6 नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली. यामुळं चीन सरकारचे धाबे दणाणले आहेत.
वुहानमध्ये पुन्हा कोरोनाची प्रकरणं समोर आल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील तब्बल 1.11 कोटी लोकांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com