BreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

धक्कादायक : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, वाचा जिल्हानिहाय तपशील

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत

तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २,

पनवेलमध्ये १ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत.

आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत.

या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १६,७३८ (६२१)
ठाणे: १६६ (३)
ठाणे मनपा: १२१५ (११)
नवी मुंबई मनपा: १११३ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४२४ (४)
उल्हासनगर मनपा: ८२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४८ (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: २९५ (११)
रायगड: १६६ (२)
पनवेल मनपा: १६१ (९)
ठाणे मंडळ एकूण: २०,६८९ (६८१)
नाशिक: ९८
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ६४९ (३४)
अहमदनगर: ५५ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: ९ (२)
धुळे मनपा: ६२ (४)
जळगाव: १७१ (२२)
जळगाव मनपा: ५२ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ११९३ (७१)
पुणे: १८२ (५)
पुणे मनपा: २९७७ (१६६)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३३५ (२०)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३७८३ (१९८)
कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३६
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८३ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १५८ (५)
औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६२१ (१९)
जालना: २०
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७९९ (२०)
लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)
अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १९० (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८७ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४२८ (२६)
नागपूर: २
नागपूर मनपा: ३२९ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३३९ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २७ हजार ५२४ (१०१९)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार २५३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५९.०४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close