मोठी बातमी : अहमदनगर शहरातील दोघांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या आता 62 !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- अहमदनगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

आज हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून १९ जणांचा अहवाल प्राप्त झाला.

त्यात हे दोघे बाधित आढळून आले तर उर्वरित १७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधित तरुणीच्या वडिलांचा दिनांक १३ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्तीच्या मुलीलाच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील एक वृद्ध महिला दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आली होती याच गल्लीत राहणाऱ्या एका युवकाचा अहवालही आज पॉझिटिव आला आहे.

या व्यक्तीचा दोन दिवसापू्वीच स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, प्रयोगशाळेने ते रिजेक्ट केल्याने काल पुन्हा पाठविण्यात आले होते.

आतापर्यंत एकूण १८१९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६९९ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६२ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.

याशिवाय काल परजिल्ह्यातील एक महिलाही बाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. आता ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment