पुण्याहून दहा कोरोना रूग्ण आणून संपूर्ण गावात थैमान घालेन…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- काष्टी येथून दररोज पुण्याला जा-ये करणाऱ्या मुन्ना बागवान याला कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या सदस्यांनी घरातच थांबण्यास सांगितले असता

मी पुण्यातून कोरोना संक्रमित दहा जणांना गावात सोडून विषाणूचा प्रादुर्भाव वाढवेन. माझे कोणी काय करु शकत नाही, अशी धमकी त्याने दिली.

त्याच्या विरोधात गुरुवारी ग्रामसुरक्षा समितीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बागवान दररोज काष्टी ते पुणे ये-जा करतो. परिसरातील व्यक्तींनी त्याची तक्रार ग्रामसुरक्षा समितीकडे केली.

याची दखल घेऊन काही सदस्यांनी बागवान याला बाहेर न जाण्याचा सल्ला दिला, परंतु त्याने ऐकले नाही. उलट त्याने १३ रोजी रात्री १० वाजता सल्ला देणाऱ्या सदस्यांना फोन करुन धमकी दिली.

पुण्याहून दहा कोरोना रूग्ण आणून संपूर्ण गावात थैमान घालेन, असे त्याने सुनावले. सदस्यांनी ही माहिती ग्रामपंचायतीला देऊन तक्रार दाखल केली.

पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असल्यामुळे सरहद्दीवरील पुलावर पोलिसांनी कडक पहारा ठेवला आहे. बागवानवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment