लाजिरवाणे! लॉकडाऊनच्या काळातही मुंबईत वाढल्यात वाहन चोऱ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई मुंबईचा आजपर्यंतचा संकटांचा इतिहास पहिला तर असं दिसून येत की कोणतंही संकट असो मुंबईकर एकमेकांना साथ देत या संकटातून बाहेर पडलेले आहेत.

परंतु या कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनच्या काळात मुंबईत लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. या काळात मुंबईत वाहनचोरीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये जास्त वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे.

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर सर्व काही ठप्प आहे. रस्त्यांवर रहदारीही नसते तरीही वाहनचोरी कशी होते हाच प्रश्न पोलिसांना पडलाय.

मे महिन्यातल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये 20 हून जास्त वाहनचोरीचे गुन्हे विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक दुचाकी आणि रिक्षा यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. अशा काळात वाहनचोर मात्र रस्त्यावर कमी वर्दळीचा गैरफायदा घेत वाहनचोरी करताना दिसत आहेत.

परळ येथील कर्नाक बंदर,भोईवाडा,डोंगरी,बोरिवली,साकीनाका,नेहरू नगर या ठिकाणीही वाहनचोरीच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. दुचाकीचे भाग काढून केली चोरी करण्याचेही प्रमाण वाढले आहे.

तसेच या चोरीचा फटका रिक्षाचालकांनाही बसला आहे. सांताक्रूझमधील रिक्षाचालक सर्वजीत गौतम यांनी ८ मे रोजी जुहू कोळीवाडा येथील मित्तल हाऊससमोरच्या पदपथाजवळ रिक्षा उभी केली होती.

लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने ते दुसऱ्या दिवशी रिक्षा सुस्थितीत आहे का हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा रिक्षा चोरी झाल्याचे लक्षात आले.

सांताक्रूझमध्येच गजधर बांध येथील संतोष पारदुळे यांच्या मालकीची रिक्षा चोरीला गेली. अशा अनेक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत.

Leave a Comment