‘जीमेल’वरुन करता येणार 100 जणांना व्हिडिओ कॉल, ते ही फ्री !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी आणि एकाच वेळी अनेकांशी व्हिडीओ मीटिंग करण्यासाठी गुगलने Google Meet हे अ‍ॅप लॉन्च केले. आता या अ‍ॅपचा वापर जीमेलद्वारेही करता येणार आहे.

ते ही संपूर्ण मोफत. यावरून एकाच वेळी 100 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर जीमेलद्वारेच Google Meet चा वापर करता येणारे एक नवीन फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरूवात केली. आता हे फीचर सर्व युजर्सच्या जीमेल अकाउंटमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.

असा करा वापर GMail अकाउंट ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला हँगआउट्स चॅटच्या वरती ‘Meet’ हा नवा पर्याय मिळेल. यावर क्लिक करुन युजर त्यांच्या गरजेनुसार Join a meeting किंवा Start a meeting हा पर्याय निवडू शकता.

ज्या युजर्सच्या जीमेलमध्ये डाव्या बाजूला ‘Meet’ हा नवा पर्याय उपलब्ध नसेल. त्यांनी उजव्या बाजूला असलेल्या जीमेल अ‍ॅप्स पर्यायवर क्लिक केल्यास तिथे हा पर्याय दिसेल.

वेब अ‍ॅक्सेसव्यतिरिक्त iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अ‍ॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून Google Meet डाउनलोड करता येईल.

Google Meet चा वापर करण्यासाठी युजरचं गुगल अकाउंट असणं गरजेचं आहे. पण, ही मोफत सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच असेल. त्यानंतर मिटिंगची वेळमर्यादा 60 मिनिटांपर्यंत सेट केली जाईल.

Google Meet च्या प्रीमियम व्हर्जनमध्ये 250 युजर्स दर्शक म्हणून सहभागी होऊ शकतात. मात्र फ्री सर्व्हिसमध्ये कंपनीकडून ही मर्यादा 100 ठेवण्यात आली आहे.

G Suite Essentials मध्ये मिळणारे डायल-इन फोन नंबर, मिटिंग रेकॉर्डिंगसारखे सर्व फीचर्स युजर्ससाठी मोफत असणार आहेत.

Leave a Comment