दररोज माठातले पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून दूर राहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली: उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच प्रत्येकाला थंड पाणी पाण्याची आस लागते. शहरांमध्ये फ्रीजमधून थंड पाणी केले जाते.

परंतु गावाकडे शक्यतो पाणी गार करण्यासाठी माठ वापरले जातात. बर्‍याच घरात लोक फ्रीज असूनही उन्हाळ्यात मातीचीच माठ वापरतात. वास्तविक, मातीमध्ये अनेक प्रकारच्या रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता असते.

त्यात शरीराला फायदेशीर खनिजे असतात. माठातील पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत.

जाणून घेऊयात याविषयी – १) मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे फोड, मुरुम, आणि त्वचेशी संबंधित इतर रोगांना दूर ठेवते. हे पाणी पिण्यामुळे त्वचा चमकत राहते.

२) अनेकांना पोटामध्ये गॅस होण्याची तक्रार असते. त्यांना या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरते. ऍसिडिटी संबंधित समस्या असेल तर माठातील पाणी फायदेशीर ठरेल. यासह, पचन प्रक्रिया योग्यरित्या चालू होईल.

३) माठातील पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यात देखील मदत करते. यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते.

४) मातीत दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते शरीरात वेदना, पेटके किंवा सूज यासारख्या समस्यांना दूर ठेवतात.

५) मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अशक्तपणाच्या आजाराशी झगडणार्‍या व्यक्तींसाठी वरदान ठरू शकते. मातीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

Leave a Comment