स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रेरणा देणारा -रेखा जरे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात घराघरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रशांत गायकवाड, निरंजन जाधव, गणेश गायकवाड, रोहिणी पवार, संतोष पागिरे, कुणाल साळूंके, अमोल कांबळे आदि उपस्थित होते.

रेखा जरे पाटील म्हणाल्या की, स्वराज्यरक्षक संभाजी महारांनी शौर्य व संयमाने दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.

कोरोनामुळे नागरिक एकमेकापासून दुरावत असले तरी या लढ्यात एक विचाराने लढा देण्याची गरज आहे. यासाठी घरा बाहेर न पडता निर्गमीत करण्यात आलेले नियम

पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व मास्क घालून यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment