अहमदनगर ब्रेकिंग : 38 गुन्हे करणारा ‘हा’ वॉन्टेड आरोपी टोळीसह पोलिसांच्या जाळ्यात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पूर्वीचे 35 व आता लागोपाठ तीन गुन्हे असे एकूण 38 गुन्हा केलेला वॉन्टेड नाशिकच्या किरण उर्फ अॅन्थोनी छगन सोनवणे (वय ३२) याच्यासह त्याची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.

दोन गावठी कट्ट्यांंसह सात जिवंत काडतुसे, दोन मोटारसायकली, 7 मोबाइल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत.

किरण उर्फ अॅन्थोनी छगन सोनवणे (वय ३२, रा. नाशिक), बाबासाहेब शिवाजी पगारे (वय २०. रा. शिंगवे, राहाता), अनिल ज्ञानदेव शिंदे (वय २२, रा. पुणतांबा, राहाता) व विकी विष्णू चावरे (वय २९, रा. राहाता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतूसे व एक रिकामी पुंगळी, सात मोबाइल, दोन दुचाकी असा एकूण १ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी साडेपाच वाजता विकास पोपट ताठे हा राहाता येथील तरूण त्याच्या दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी विकासच्या दुचाकीसमोर त्यांची दुचाकी उभी करून त्याला अडवले.तसंच त्याला मारहाण केली.

बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. विकासने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमले. त्यावेळी जमाव पाहून आरोपींनी हवेत गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी नारायण रामचंद्र म्हस्के (वय २५, रा. विश्रांतवाडी , पुणे) याला पकडले. त्याला राहाता पोलिसांच्या ताब्यात दिले. तर, उर्वरित दोन आरोपी शेतामध्ये पळून गेले.

या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या आदेशानुसार

अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नेमली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते. या पथकाला या घटनेतील मुख्य आरोपी किरण सोनवणे हा राहाता तालुक्यातील शिंगवे येथे लपल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत शिंगवे येथून किरण सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली

व त्याच्या इतर साथीदारांची माहिती सांगितली. या माहितीच्या आधारे आरोपी बाबासाहेब पगारे, अनिल शिंदे व विकी चावरे यांनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment