अहमदनगर ब्रेकिंग : झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग, पालिकेच्या दोन कामगारांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नाकाबंदीच्या ठिकाणावरील झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या दोन कामगारांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही कामगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिकेने विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.लाख रस्ता या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी ठिकाणी झोपडपट्टी आहे. येथील एक महिला शेतमजुरीसाठी जाते. ती कामावरून घरी येत असताना

या नाक्यावरील नगरपालिका कामगार नंदू रत्नाकर शिरसाठ व दत्तात्रय मुक्ताजी मोरे या दोघांनी गेल्या काही दिवसापासून अश्लील भाषा वापरून छेड काढत होते.

शुक्रवार दि.15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ती महिला शेतमजुरी करून घरी आली असता घरासमोर हातपाय धूत असताना नंदू शिरसाठ हा फिर्यादी महिलेस तुझा पाय वाकडा पडत आहे.

असे म्हणाला असता, तू असे का बोलतोस? अशी विचारणा केली असता नगरपालिकेच्या दोन्ही कामगारांनी फिर्यादी महिलेस मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

त्यावरून त्या महिलेने या दोघां विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील दत्तात्रय मोरे कर्मचार्‍यास देवळाली प्रवरा विटभट्टी नाकाबंदीच्या ठिकाणी 2 ते 5 नाकाबंदीसाठी नेमणूक केलेली आहे.

या ठिकाणावरील नाकाबंदी संपवून तो लाख रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन बसत होता. अनेक दिवसांपासून छेड काढण्याचा प्रकार चालू होता.

शुक्रवार दि.15 रोजी लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. हा सर्व प्रकार फिर्यादी महिलेने घरी सांगितला. घरच्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment