चारित्र्याचा संशय घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  चारित्र्याचा संशय घेवून एका महिलेस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

नगर तालुक्यातील भातोडी येथील किरण किसन काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

साक्षी किरण काळे असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे.

साक्षी काळे यांनी कापूरवाडी येथील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

याप्रकरणी भाऊसाहेब राजाराम धामणे (वय ४२) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

आरोपी हा मयत साक्षी किरण काळे यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

महिलेस शारिरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment