साखर कारखान्यामध्ये लागली अचानक आग, बगॅसचा डेपो भस्मसात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या भुस्सा डेपोला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत बगॅसचा एक डेपो भस्मसात झाल्याने कारखान्याचे अठरा लाख रुपयांचे नुकसान झाले.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. शनिवारी रात्री साडेआठ वाजता कारखान्याच्या बगॅस (भुस्सा) डेपो जवळील जमिनीखालील उच्चदाब वीजवाहिनी तुटली.

त्यात, वीज प्रवाह असल्याने उडालेल्या ठिणग्यांनी बगॅस (भुस्सा) पेटला. जाळ व धुराचे लोट उठले. कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांना फोन केला.

त्यांनी राहुरी नगरपालिकेचा एक अग्निशामक बंब पाठविला. राहुरी व देवळाली प्रवरा पालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी, कारखान्याचे सुरक्षा अधिकारी बाळासाहेब तनपुरे,

सुरक्षा कर्मचारी संजय घोगरे, एकनाथ वरघूडे, अशोक गाडेकर, सुरेश आदमाने , पोपट नालकर , विठ्ठल म्हसे , इंद्रभान पेरणे , अशोक कदम व परिसरातील तरुणांनी परिश्रम घेऊन, एक तासात आग आटोक्यात आणली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment