BusinessWorld

काय ! कारमध्ये बसण्याचे महिन्याला ३ लाख

आज १२ – 13 घंटे काम करून जेमतेम पगार अशी बिकट अवस्था सध्या प्रायव्हेट सेक्टरची झाली आहे. परंतु जर तुम्हाला कार मध्ये बसण्याचे महिन्याला ३ लाख रुपये मिळाले तर?

धक्का बसला ना! गुगलने केवळ कारमध्ये बसण्यासाठी दर तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी देऊ केली आहे.

ही संधी केवळ अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे गुगल त्यांच्या सेल्फड्रीव्हन कारच्या चाचण्या या भागात घेत आहे. त्यासाठी त्यांनी पदवीधरांकडून अर्ज मागविले आहेत.

काम इतकेच की निवड झालेल्या उमेदवारांनी या कारमध्ये बसायचे आणि तासाला २० डॉलर्स प्रमाणे मेहनताना घ्यायचा. कामाचे तास आहेत ६ किवा ८. म्हणजे आठ तास काम केले तर महिन्याला ३ लाख रूपये पगार.

यासाठी इच्छुक उमेदवार पदवीधर हवा तसेच त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड असता कामा नये. प्रतिमिनिट ४० शब्द या वेगाने टायपिंग करता यायला हवे व निवड झाल्यास १२ ते २४ महिन्यांचा करार त्याला करावा लागेल.

ही कार आपोआप चालणारीच आहे पण समजा मध्येच कांही गडबड झाली तर सीटवर बसलेल्या या उमेदवाराने कार सांभाळायची आहे. प्रत्येक सेशनचा लिखित व तोंडी फिडबॅक कंपनीला द्यायचा आहे. त्यानुसार कारमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button