तीनशे फुट खोल दरीत ऊडी मारून वृद्धाची आत्महत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापूरी घाटात असलेल्या तामकडा (शेनकडा) वरून ऊडी मारून वयोवृद्धाने आत्महत्या केली.

दिलीप दगडू वाघ (वय 65, रा. गुंजाळवाडी) असे या वयोवृद्धाचे नाव आहे. दिलीप वाघ हे वयोवृद्ध गुंजाळवाडी याठिकाणी राहात होते.

रविवारी सकाळी त्यांनी चंदनापूरी घाटात असलेल्या तामकडा यावरून आडीचशे ते तीनशे फुट खोल दरीत ऊडी मारून आत्महत्या केली.

त्याठिकाणी असलेल्या काही नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी ही माहिती तालुका पोलीस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाघ यांचे डोके आपटून फुटून गेले होते. त्यामुळे ते जागीच मृत्यू झाला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

याप्रकरणी किरण वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment