Best Sellers in Electronics
BreakingMaharashtraPolitics

CM Uddhav Thackeray Live Updates : लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही…

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन – 4 ची कालपासून सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.

Live Updates साठी पेज रिफ्रेश करा 

रेड झोन हा लवकरात लवकर रेड झोन करणं ही दोन आव्हानं आहेत, ग्रीन झोन कोरोनामुक्त ठेवायचा आहे

मनुष्यबळ कमी पडत असेल तर भूमीपुत्रांना पुढे या, महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी ग्रीन झोनमधील तरुणांनी आत्मविश्वासाने बाहेर पडा

नवीन उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत, राज्यात नवीन उद्योगपर्व सुरु होणार , नवीन उद्योजकांना भाडे तत्वावर जमीन मिळेल.

महाराष्ट्रात 40 हजार एकरहून अधिक जमीन उद्योगांसाठी राखीव,ग्रीन इंडस्ट्रीसाठी कोणत्याही अटी नाहीत

नवीन सरकारच्या योजना या कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणले जाणारच

सगळीकडे निर्बंध असतील तरी काही ठिकाणी उद्योग सुरू झाले,राज्यातील पन्नास हजार उद्योग सुरू करण्याची परवानगी

एका बाजूला सगळं बंद करून हळूवार पणे काही गोष्टी सुरू करत आहोत, रेड झोन मात्र शिथील करता येणार नाही

ग्रीन झोनमधले निर्बंध आणखी शिथील होत आहेत. ऑरेंजमध्येही समान परिस्थिती आहे.

आपण कोरोनाच्या गुणाकारावर नियंत्रण ठेवलं आहे.जर लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही.

मनात प्रश्न उभे राहू शकतात की, नक्की काय सुरू आहे, महाराष्ट्रात आजही रुग्णांची संख्या वाढत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button