Maharashtra

राज्यात ५ हजार १८९ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू

मुंबई दि.18 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 5 हजार 189 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे.

सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्हयांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सातारा,

10. सिंधुदुर्ग, 11. रत्नागिरी, 12. नाशिक, 13. धुळे, 14. नंदुरबार, 15. जळगाव, 16. जालना, 17. लातुर, 18. नांदेड, 19. परभणी, 20. हिंगोली, 21. नागपुर, 22. भंडारा 23. गोंदिया, 24. यवतमाळ, 25. अमरावती, 26. अकोला, 27. वाशिम, व 28. बुलढाणा.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु न केलेल्या जिल्हयांची नावे :- 1. औरंगाबाद, व 2. बीड,

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु झाल्या होत्या परंतु पुन्हा अनुज्ञप्ती बंद करण्यात आल्या :- 1. मुंबई शहर, व 2. मुंबई उपनगर.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु होणाऱ्या जिल्ह्यांचे नाव:- 1. उस्मानाबाद.  (दि.19-05.2020 पासून मद्य विक्री सुरु होणार आहे.)

2.मद्यविक्री सुरु असलेल्या अनुज्ञप्तींची संख्या :-

एकूण अनुज्ञप्ती आणि कंसात चालू अनुज्ञप्ती

1

CL – III (देशीमद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती)

4159 (2031)

2

FL – II ( वाईन शॅाप )

1685 (714)

3

FL BR – II( बीयर शॉप )

4947 (2444)

एकूण 10 हजार 791 (5 हजार 189)

राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत तोपर्यंत मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निदर्शनास आणण्यात येते की,

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे.

सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

राज्यात 24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे.

काल दि.17 मे, 2020 रोजी राज्यात 33 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 19 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 लाख 46 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासुन दि.17 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,715 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,577 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तर 579 वाहने जप्त करण्यात आली असून रु.15.35  कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे.

त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  हा ई-मेल – commstateexcise@gmail.com  असा आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button