या एका सोप्या उपायाने तुमच आरोग्य राहील चांगलं !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सध्याची धावपळयुक्त जिवनशैली, आहाराकडे होणारे दुर्लक्ष, फास्टफूड खाणे, किंवा वातावरणातील बदलामुळे ही आपल्या पोटात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात.

वेळीच या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ज्यावेळी दीर्घकाळपर्यंत हे बॅक्टेरिया शरीरात असतात. त्यावेळी सतत तोंडात थुंकी जमा होण्याची समस्या उद्भवते.

शरीरात प्रामुख्याने फर्मिक्यूट, बॅक्टेरॉइड, एक्टिनोबॅक्टीरिया आणि प्रोटोबॅक्टीरिया असतात. ते पोटासाठी फायदेशीर समजले जातात. याशिवाय काही बॅक्टेरिया असतात ते नुकसानकारक ठरतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही.

परिणामी गंभीर आजार होतात. सर्वत्र सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबू या पदार्थाने पोटातील घातक बॅक्टेरिया संपवण्यासाठी मदत होऊ शकते.

लिंबात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटामीन सी आणि सिट्रिक एसिड असतं. यामुळेच पोटात असणारे बॅक्टेरिया लिंबाच्या सेवनाने नाहीसे होतात.

सगळ्यात आधी लिंबू कापून घ्या. त्यानंतर लिंबाचा रस काढा. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. नंतर या पाण्याचे सेवन करा. लिंबात अनेक एंटीबॅक्टेरिअल गुण असतात.

त्यातील सिट्रिक एसिड बॅक्टेरियांना मारण्यासाठी फायदेशीर ठरतं. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा या ड्रिंकचे सेवन करणं आवश्यक आहे. त्यामुळे पोटातील घाण निघून जाण्यात मदत होईल. तसंच आरोग्य चांगलं राहील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment