Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCrime

दारूड्यांकडून महिलेस मारहाण

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- दारूच्या नशेत महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. भिंगारमधील इंदिरानगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. 16) ही घटना घडली.

याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात विशाल साबळे, करण साबळे, सिदान साबळे (सर्व रा. भिंगार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणीत रेणुका अविनाश भिंगारदिवे (वय 27, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, भिंगार) या जखमी झाल्या आहेत.

विशाल साबळे व इतर दोघे भिंगारदिवे यांच्या घरासमोर दारू पिऊन आले. ते महिलेस शिवीगाळ करून लागले. शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली.

त्यामुळे रागाविलेल्या तिघांनी भिंगारदिवे यांना लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रेणुका भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button