अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नेवासे तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदिरामागे चिंचबन शिवारात प्रवरा नदीत सोमवारी सकाळी नेवासे खुर्द येथील पप्पू अब्दुल पठाण (वय ३२) या तरुणाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
मृताचा भाऊ आयुब अब्दुल पठाण याने पोलिसांना खबर दिली. १८ मे रोजी सकाळी अकरा वाजता भाऊ त्याच्या चार मित्रांबरोबर मजुरीच्या कामासाठी गेला होता, असे त्यात म्हटले आहे.
पोलिस निरीक्षक रणजित डेरे, कॉन्स्टेबल संभाजी गर्जे व हवालदार तुळशीराम गिते यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृताच्या चार मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com