Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCorona Virus Marathi News

ब्रेकिंग : संगमनेरमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण आढळला !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- संगमनेर शहरातील इस्लामपुरामधील वयस्कर व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचे अहवाल आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सात जणांना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

आरोग्य तपासणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. ८ मे रोजी एका शस्त्रक्रियेसाठी हा रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल झाला होता.

संशयास्पद वाटल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तो कोरोनाबाधित असल्याचे ११ मे रोजी समजले. संगमनेर प्रशासनाला उशिरा ही माहिती मिळाली.

दरम्यान शासनाच्या पोर्टलमध्ये या रुग्णाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात होणार नसल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button