जाणून घ्या काय आहे स्तनाचा कर्करोग …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. यामध्ये काही अंशी अनुवांशिकता आढळते.

स्त्रियांमध्ये वयोगट ४० वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या घराण्यात या कर्करोगाचा इतिहास आहे अशा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो.ज्या स्त्रियामध्ये मासिक पाळी लवकर सुरु झाली आहे,

ज्या स्त्रिया स्थूल आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेत आहेत, अशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असू शकते.जर मुले वयाच्या तिशीनंतर झाली असतील तर अशा स्त्रियांना धोका असू शकतो.

जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, त्याचप्रमाणे वैद्यकीय चाचण्यांबाबत जागृतीचा अभाव, कॅन्सर तज्ज्ञ तसेच तपासणीसाठी सोयी-सुविधांचा अभाव यामुळे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे.

स्तनाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असून जगभरात २.१ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात, स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगाचा प्रकार आहे, ज्यामध्ये दर १ लाख महिलांपैकी १२.७ टक्के महिलांचा मृत्यू होतो आहे.

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, स्तन कर्करोगाचा सामना करण्यासाठी वेळोवेळी निदान आणि वेळेवर उपचार करणे तसेच त्याविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.

स्तनाच्या कर्करोग हा ४० ते ६० वर्षे वयोगटात पाहायला मिळतो; परंतु आता मात्र तरुण मुलींनाही या कर्करोगाचा धोका वाढला आहे. दर महिन्याला सर्वच महिलांनी किमान १० मिनिटे वेळ स्वत:साठी राखून ठेवत पाळीच्या सातव्या दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.

एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी सपर्क साधा. स्तनातील गुठळ्या, सूज येणे, त्वचेचे निस्तेज होणे आदी बदलांचे परीक्षण करणे. यामुळे स्तनाचा कर्करोग ओळखला जाऊ शकतो, तसेच केमोथेरपी तसेच शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात. रोजच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून ताज्या पालेभाज्या, फळं, पौष्टिक आहाराचा रोजच्या जीवनात समावेश करा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment