Entertainment

ग्लॅमरस लुक देणाऱ्या सुहाना खाननं परिधान केला १३ वर्षांपूर्वीचा आईचा ड्रेस?

सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं प्रायव्हेट सेटिंग बदलून पब्लिक केलं आहे.

यानंतर तिच्या अधिकृत पेजवर एकापेक्षा एक हटके स्टाइलमधील फोटो पाहायला मिळत आहेत.ब्लँक अँड व्हाइट पोल्का ड्रेसमध्ये असणाऱ्या सुहाना खाननं चाहत्यांचा मन जिंकलं आहे.

यात ती तिच्या मैत्रिणीसोबत दिसत असून कमीत कमी मेक अप, मोकळे केस, कॅट आयलाइनर, पिंक कलरचं लिपस्टिक यामध्ये सुहाना अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

दरम्यान अशाच डिझाइनचा ड्रेस सुहानाची आई गौरी खाननंही काही वर्षांपूर्वी परिधान केला होता. मिळालेल्या माहितीनुसार सुहानानं परिधान केलेला हा पोल्का डॉट ड्रेस तिच्या आईचाच असल्याचं म्हटलं जात आहे.

हा ड्रेस गौरीनं जवळपास १३ वर्षांपूर्वी परिधान केला होता. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या बर्थडे पार्टीसाठी गौरीनं हा ड्रेस परिधान केला होता.

या फोटोमध्ये गौरीच्या ड्रेसवर कमरेभोवती डबल साइडेड बेल्ट आणि हातामध्ये गोल्ड क्लच दिसत आहे. ज्यामध्ये गौरीचा लुक परफेक्ट दिसत आहे.

गौरीचा हा आवडता ड्रेस असावा. कारण २००७मध्ये शाहरुख खानचा बॉक्सऑफिसवर आलेला सिनेमा ‘ओम शांति ओम’च्या प्रीमिअरमध्येही तिनं हाच ड्रेस परिधान केला होता. पण यावेळेस त्यावर स्टायलिश बेल्ट तिनं मॅच केला होता.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close