महत्वाची बातमी : लॉकडाऊन-4’ संदर्भात नवे नियम जाहीर, वाचा काय असेल सुरु आणि बंद ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- ‘लॉकडाऊन-4’ संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार राज्यात रेड झोन, नाॅन रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन असणार आहे. दरम्यान, नवीन नियमावली 22 मेपासून लागू होणार आहे.

या गोष्टींवर बंदी कायम

डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार

शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद,

हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार.

केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील उपहारगृहे, तसेच पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन भागातील उपहारगृहे सुरु

सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद

सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी

सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार

रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता

या गोष्टी सुरू राहणार

दारु दुकाने (रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी),

कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार, अन्य झोनमध्ये सुरु राहणार

वैद्यकीय दवाखाने कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र सुरु राहणार

कंटेनमेंट झोन वगळता हॉटेलमधून होम डिलिव्हरीला परवानगी

कंटेनमेंट झोन वगळता RTO कार्यालये सुरु राहणार

ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये टॅक्सी, रिक्षामध्ये चालकासह 2 जण अशी तिघांना परवानगी.

मालवाहतुकीला सर्वत्र परवानगी

रेड झोनमध्ये शहरी भागात एकलदुकानांना मर्यादीत परवानगी.

अत्यावश्यक दुकानांना सर्वत्र परवानगी

कंटेनमेंट झोन वगळता बँका, वित्तीय सेवा सुरु राहणार

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment