मुंबई ,पुण्यातील स्थलांतरितांनी वाढविली ग्रामीण भागाची भीती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बुलडाणा 18 मे 2020 :-लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर आता अनेक नागरिक आपल्या घराकडे प्रवास करत आहे. परंतु पुणे आणि मुंबई मध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असल्यामुळे  या ठिकाणावरून ग्रामीण भागात येणाऱ्या  लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे.

आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भाग आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईहून आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने खामगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या त्या ६५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा आज.१८ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यु झाला.

ही महिला ही मुंबई येथून ११ में रोजी स्थानिक जिया काँलनी भागातील तीच्या नातेवाईकांकडे आली होती. तेव्हापासूनच तिची प्रकृती ढासाळलेली होती.

प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्या महिलेला सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तिच्या स्वँब नमुन्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला होता.

यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. तर तिच्या संपर्कातील १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहेच परंतु ते थांबण्याचे नाव घेत नाही.

मुंबईत जवळपास आता २1 हजार रुग्ण झाले आहेत. पुण्यातही कोरोनाची परिस्थिती घातकच आहे. त्यामुळे या ठिकाणावरून ग्रामीण भागात परतलेल्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Comment