अहमदनगर ब्रेकिंग : नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूर शहरातील  ईश्वरी आनंद बावीस्कर या १४ वर्षांच्या विद्यार्थिनीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेतला.

सूतगिरणी भागात राहात होती व भि. रा. खटोड कन्या विद्यालयात शिकत होती.

तिला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले.

ईश्वरी आठवीतून नववीच्या वर्गात गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment