अहमदनगर जिल्ह्यातही लवकरच सुरु होणार दारू घरपोहच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.

दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर दुकानासमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने करोनाचा धोका होण्याची भिती व्यक्त होऊ लागली. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने आता घरपोहच दारूला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दारुची होम डिलिव्हरी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचा परवाना गरजेचा आहे.

त्यानुसार दारुची होम डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे. नगरमध्येही डिलिव्हरी बॉयने अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 17 डिलिव्हरी बॉयने मद्य घरपोच करण्याचा परवाना घेतला आहे.त्यामुळे जिल्ह्यात लवकरच दारुची होम डिलिव्हरी सुरू होईल.

त्यामुळे लवकरच जिल्ह्यात दारुची होम डिलिव्हरी सुरू होईल. मद्य विक्रीला 5 मे पासून सुरुवात झाली. दीड महिन्यानंतर दारुची दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी तब्बल एक लाख लीटर दारुची विक्री झाली होती.

त्यानंतर दिवसाला सरासरी 80 हजार लीटर दारुची विक्री होत आहे. आतापर्यंत सुमारे साडेदहा लाख लीटर दारू विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

घरपोच मद्य विक्री सुरू झाल्यानंतर मद्य विक्रीत वाढ होईल असा अंदाज आहे. ज्यांना परवानगी दिली ते डिलिव्हरी बॉय लवकरच घरपोच मद्य विक्रीला सुरुवात करणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment