Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthCultureSpacial

वंचितांची ईद गोड करण्यासाठी शरद पवार विचार मंचचा पुढाकार

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव म्हणजेच रमजान ईद. मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले कामगार व आर्थिक दुर्बल घटक असलेल्या गरजूंना

ईद साजरी करता यावी यासाठी शरद पवार विचार मंचच्या वतीने शीरखुर्माच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तर इतर गरजू समाज बांधवांना देखील किराणा किट देऊन, या महाभयंकर संकटकाळात त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. तपोवन रोड येथील झोपड्यात जाऊन तर मुकुंदनगर येथील काही गरजूंना शीरखुर्माचे साहित्य वाटण्यात आले.

तसेच शहरातील विविध भागामध्ये गरजू मुस्लिम बांधवांना शीरखुर्मा तर इतर बांधवांसाठी किराणा साहित्य वाटपाचे काम सुरु आहे. अल्ताफ सय्यद म्हणाले की, ईस्लाम धर्मात वंचितांची सेवा करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हीच खरी ईद आहे. ज्याचा शेजारी उपाशी आहे, अन तो पोटभर अन्न खातो तो मुस्लिम होऊ शकत नाही.

सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहे. किमान त्यांची ईद गोड व्हावी म्हणून त्यांना शीरखुर्माचे साहित्य वाटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अल्ताफ सय्यद स्वखर्चाने लॉकडाऊन लागल्यापासून सर्व गरजूंना अन्न-धान्य व किराणा सामान पुरवित आहे.

विचार मंचच्या माध्यमातून नगर तहसिल कार्यालय, तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून सॅनीटायझेशन कक्ष उभारण्यात आले आहे.

तर चौका-चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांसाठी पाणी बॉटल, एनर्जी ड्रिंक, च्यवनप्राश व सॅनीटायझरचे देखील त्यांनी वाटप केले आहे. या

उपक्रमासाठी सय्यद यांच्या कुटुंबीयांसह महेश पाटोळे, अर्जुन बडेकर, आयान सय्यद, मुजीब सय्यद, राहिल शेख, शहाब सय्यद परिश्रम घेत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button