राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले,

त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले.

यावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य विधिज्ञ रवींद्र बोरावके यांनी प्रास्ताविक केले.गटनेते रवींद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आदी उपस्थित होते.

माजी आ. कोल्हे यांनी निवेदनात पुढे म्हटले, देशात कोरोना रुग्णात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी तीन महिन्याची घरपट्टी,

पाणीपट्टी माफ करावी, तसेच बॅंका, पतसंस्था यांनीही कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करावे, स्थानिक बाजारपेठा सम-विषम तारखेनुसार सुरू कराव्यात, २०१४ते २०१९ या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत

.कोरोना लढाईत केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणण्यात महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव आहे.

याचा भाजपच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करत आहोत.महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊन कोरोना रुग्णांना व सामान्य नागरिकांना दिलासा वाटेल असे काम करावे,असे शेवटी कोल्हे म्हणाल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment