Maharashtra

एकाच दिवसात १२०२ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१९ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. आज २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

Maha Info Corona Website

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३२५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४३,

ठाणे शहरात १५, पुण्यात ६, अकोल्यात ३, नवी मुंबईमध्ये २, बुलढाणा २, नागपूर शहरात २, औरंगाबाद शहरात १, धुळे शहरात १ तर नाशिक शहरात १  मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३०  रुग्ण आहेत तर ३९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये (७६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १३२५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ३० एप्रिल ते १६ मे या कालावधीतील आहेत.

या कालावधीतील ४४ मृत्यूंपैकी २२ मुंबईचे, १५ ठाण्याचे, अकोला मनपाचे २ तर बुलढाणा १, धुळे १, नागपूर १ नाशिक १ आणि पुण्यातील १ आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात सध्या १७६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५ हजार १७८ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६३.२९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २२,७४६  (८००)

ठाणे: २५३ (४)

ठाणे मनपा: १९१६ (३)

नवी मुंबई मनपा: १५०४ (२४)

कल्याण डोंबिवली मनपा: ५५७ (६)

उल्हासनगर मनपा: १०३

भिवंडी निजामपूर मनपा: ५०  (३)

मीरा भाईंदर मनपा: ३३१ (४)

पालघर:६७  (३)

वसई विरार मनपा: ३९६ (११)

रायगड: २६४ (५)

पनवेल मनपा: २४४ (११)

ठाणे मंडळ एकूण:  २८,४३१  (९०४)

नाशिक: १०४

नाशिक मनपा: ८२ (२)

मालेगाव मनपा: ६५४ (३४)

अहमदनगर: ४२ (५)

अहमदनगर मनपा: १८

धुळे: १३ (३)

धुळे मनपा: ७१ (६)

जळगाव: २३३  (२९)

जळगाव मनपा: ७० (४)

नंदूरबार: २५ (२)

नाशिक मंडळ एकूण: १३१२ (८५)

पुणे: २१२ (५)

पुणे मनपा: ३८४६ (२०२)

पिंपरी चिंचवड मनपा: १८२ (४)

सोलापूर: ९ (१)

सोलापूर मनपा:४३०  (२४)

सातारा: १४२ (२)

पुणे मंडळ एकूण: ४८२१  (२३८)

कोल्हापूर:६२  (१)

कोल्हापूर मनपा: १९

सांगली: ४७

सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १०२ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: २४८ (५)

औरंगाबाद:१६

औरंगाबाद मनपा: १०१२ (३४)

जालना: ३८

हिंगोली: १०७

परभणी: ६ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: ११८१ (३५)

लातूर: ४७ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: ११

बीड: ५

नांदेड: ९

नांदेड मनपा: ७० (४)

लातूर मंडळ एकूण: १४५ (६)

अकोला: २८ (२)

अकोला मनपा: २५९ (१५)

अमरावती: ७ (२)

अमरावती मनपा:  ११२ (१२)

यवतमाळ: १०१

बुलढाणा:३३ (३)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण:५४३ (३४)

नागपूर: २

नागपूर मनपा: ३८६ (६)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ७

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ५

नागपूर मंडळ एकूण:  ४०९ (७)

इतर राज्ये: ४६ (११)

एकूण:  ३७ हजार १३६  (१३२५)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २४२ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

आय सी एम आर पोर्टलवरील माहितीचे डेटा क्लिनिंग सुरु असल्याने एकूण रुग्ण संख्येत बदल होऊ शकतो. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

आतापर्यंतचे सर्वाधिक १२०२ रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- ६२२, ठाणे- १९४, पालघर- २७, रायगड- १०, नाशिक- ८८, अहमदनगर- ८, जळगाव-२८, पुणे-१३१, सोलापूर-११, सातारा-२, सांगली- १, औरंगाबाद- ३१, जालना-१, अकोला-४, अमरावती-३, यवतमाळ- १, नागपूर- ४० रुग्ण सोडण्यात आले आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button