India

शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील रामपूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांना अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या व ते पसार झाले.

शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील आगापूर भागात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस महासंचालक रमित शर्मा रामपूर येथे पोहोचले आहेत.

रमित शर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी अनुराग शर्मा यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. ज्वालानगरात राहाणारे अनुराग शर्मा भाजीपाला घेऊन स्कूटीने घरी जात होते.

त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोन मारेकऱ्यांनी अनुराग शर्मा यांच्यावर खुलेआम गोळी झाडली. नंतर मारेकरी पसार झाले. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. या घटनेनंतर अनुराग शर्मा यांचे समर्थक संतापले असून त्यांनी जिल्हा हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.

परिस्थिती गंभीर झाल्याचं लक्षात येताच हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफने स्वत:चा जीव वाचवण्यालाठी तेथून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button