अहमदनगर ब्रेकिंग: पोलिसांना सापडला मद्याचा लाखोंचा साठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील एकाने बेकायदा दारुचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

तेथून अडीच लाखांचा दारुचा साठा जप्त केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे एकाला बिअर शॉपी चालविण्याचा परवाना आहे.

बियर शॉपी चालक बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी या बियर शॉपीवर छापा टाकला. त्यावेळी या शॉपीमध्ये देशी- विदेशी दाररू आढ़ळून आली.

त्याने काही साठा घरी ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता घरातील मंडळीनी कारवाईस विरोध करत गोंधळ घालन्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिस पथकाने त्यांना योग्य ती समज देत घरात लपवून ठेवलेला दारुचा साठा जप्त केला आहे. यात सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment