अहमदनगर ब्रेकिंग : *22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण*

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात ०६ वर्षीय बालिका आणि २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

काल बाधीत आढळलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेची राशीन येथे आलेली ०६ वर्षीय नात कोरोना बाधीत झाली आहे तसेच पाथर्डी तालुक्यातील चींचपुर पांगुळ येथे माहेरी आलेली एक 22 वर्षीय गरोदर माता कोरोना बाधित आढळून आली आहे. ही महिला कळंबोली येथील आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

आज रात्री हे सर्व अहवाल प्राप्त झाले. या दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे आल्या होत्या. त्या काल कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्यांची ०६ वर्षीय नात बाधीत आढळली.

याशिवाय पाथर्डी तालुक्यातील २२ वर्षीय महिला बाधीत आढळून आली. तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयातून तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला असता ती बाधीत आढळून आली, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

सध्या जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या ७२ असून या दोन व्यक्तींची नोंद त्या त्या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.आज सकाळी पाठवलेल्या मध्ये ०२ स्त्राव नमुन्यांचे विश्लेषण करता न आल्याने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महावद्यालयाने ते स्त्राव पुन्हा पाठविण्यास सांगीतले आहे.

Leave a Comment