Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

केसातील कोंडा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  वेगवेगळे हेअर जेल, क्रीम, शाम्पू आणि अनेक केमिकल युक्त उत्पादने वापरणायचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केसांमध्ये कोंडा होणे ही सामान्य समस्या बनली आहे.

केसांमध्ये कोंडा झाल्यास खाज येऊ लागते. केसांच्या त्वचेवर अधिक खाजवल्यास जखमाही होऊ शकतात. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. आणि इतरही आजार होऊ शकतात. जाणून घेऊयात केसातील कोंडा दूर करण्यासाठीचे उपाय

– १) नियमित केस विंचरणे : कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे केस विंचरणे महत्त्वाचे असते. केस नियमित विंचरल्याने केसांची वाढही होते.

२) झिंक पॅराईथिन युक्त शाम्पू : कोंडा झाल्यास चांगल्या प्रतीचा शाम्पू वापरावा. अशा हेअर प्रॉडक्टचा वापर करा ज्यामध्ये झिंक पॅराईथिन असते. कोंडा दूर करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो.

३) कोरफड: कोरफडीच्या गराने केसांना मसाज करा आणि एका तासाने केस धुवा. असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

४) नारळाच्या तेलात कापूर मिसळून ठेवा. आंघोळ करण्याआधी केसांना या तेलाने मसाज करा. नियमितपणे हे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

५) एक ग्लास पाण्यात चार चमचे बेसन मिसळून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवा त्यानंतर केस धुवा. हा उपाय साधा आणि फायदेशीर आहे.

६) दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोन चमचे पाणी एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांना लावून १५ मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल.

७) पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होईल. ८) कडुनिंबाची पाने नीट वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. हा लेप केसांना लावा. थोड्या वेळावे केस धुवा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.