अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आता दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होत आहे. आजपासून जिल्ह्यातील आता दहा आगारांतून 32 बसच्या 166 फेऱ्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी 65 चालक व 65 वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे,

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस प्रवाशांना घेऊन जिल्ह्यात धावली नव्हती. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार बससेवा सुरू करण्यात येत आहे.

सोडण्यात येणार्‍या बसेस अशा- तारकपूर ः नगर-संगमनेर (12 फेर्‍या), नगर-वांबोरी (12 फेर्‍या), तारकपूर-राशीन (4 फेर्‍या), नगर-पाथर्डी (8 फेर्‍या). शेवगावः शेवगाव-नगर (18 फेर्‍या), शेवगाव-संगमनेर (6फेर्‍या).

जामखेडः जामखेड-नगर (4फेर्‍या), जामखेड-कर्जत (4फेर्‍या). श्रीरामपूरः श्रीरामपूर -कोपरगाव (8फेर्‍या), श्रीरामपूर -नगर (24फेर्‍या). कोपरगावः कोपरगाव-श्रीरामपूर (8फेर्‍या), कोपरगाव-संगमनेर (4फेर्‍या), कोपरगाव-नगर (12फेर्‍या).

पारनेरः पारनेर-सुपा-नगर (6फेर्‍या), पारनेर-जामगाव-नगर (6फेर्‍या). संगमनेरः संगमनेर-नगर (10फेर्‍या). श्रीगोंदाःश्रीगोंदा-नगर (8फेर्‍या), श्रीगोंदा-कर्जत (6फेर्‍या).

नेवासाः नेवासा-नगर((8फेर्‍या), नेवासा-शिर्डी. (8फेर्‍या).पाथर्डीःपाथर्डी-नगर(8फेर्‍या), पाथर्डी-शेवगाव (8फेर्‍या). अकोलेःअकोले-राजुर (10फेर्‍या), अकोले-संगमनेर (16फेर्‍या)अकोले-मोग्रस-कोतूळ (6फेर्‍या).

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment