या भागांमध्ये आजपासून धावणार लालपरी ; ‘या’ आहेत अटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता शासनाने एसटी सेवा सुरु करणार आहे.

आज (२२ मे) रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असून यासाठी काही अटी आणि शर्ती यांचे पालन करावे लागेल अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता अटी-शर्तींसह जिल्हाअंतर्गत एसटी बस सुरू करायला परवानगी दिली आहे.

त्यामुळे निवडक मार्गांवर एसटी बससेवा सुरू होणार आहे. चौकात ‘या’ आहेत अटी १. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत बस सेवा सुरु राहील.

२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. ३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

४. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. ५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. ६. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

 

Leave a Comment