Maharashtra

धक्कादायक खुलासा : ‘या’ कारणामुळे केलं होत अजित पवारांनी बंड …

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याने खूप मोठं राजकारण अनुभवलं. युतीला बहुमत मिळूनही शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

परंतु अजित पवारांनी त्यावेळी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा घाट घातला. परंतु त्यानंतर अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीमध्ये आले.

पण अनेकांच्या मनात एक प्रश्न अजूनही घर करुन आहे की, अजित पवारांनी त्यावेळी बंड करुन भाजपसोबत सत्ता का स्थापन केली होती. अजित पवार यांनी बंड का केले? हा प्रश्न अजुनही गुलदस्त्यात आहे.

पण पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या चेकमेट पुस्तकात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पुस्तकात असं म्हटलं आहे की, शिवसेनेसोबत वाटाघाडी सुरु असताना सुप्रिया सुळे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्याचं ठरलं.

त्यानंतर अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरु झाली. त्यामुळे नाराज झालेले अजितदादा बैठकीतून निघून गेले. आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना धक्का देण्याचं ठरवलं.

२२ नोव्हेंबरच्या रात्री बैठकीतून अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोफिटल हॉटेलमध्ये चर्चा झाली. अजित पवार 38 आमदार फोडण्याच्या तयारीत होते.

महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना देखील माहित होता. ३८ पैकी २० जणांना मंत्रिपद देण्याची चर्चा ही झाली होती.

पण शरद पवारांना याबाबत काहीच माहित नव्हते. पण सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही. बहुमत नसल्यामुळे दोघांनी राजीनामा दिला. पण नंतर पुन्हा अजितदादा यांना उपमुख्यमंत्री देण्यात आलं.

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button