MaharashtraPolitics

शिवसेना मंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य !

रत्नागिरी :- रत्नागिरीसह कोकणात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यासाठी तहसीलदारांची कार्यप्रणाली कारणीभूत असल्याची टीका तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

तहसिलदारांनी मुंबईकरांना थेट गावात सोडल्यामुळेच अशी परिस्थिती ओढावल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मंडणगड, दापोली संगमेश्वरच्या तहसिलदारांवर कुणाचा होता दबाव? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

उदय सामंत म्हणाले की, तहसिलदारांनी स्वॅब टेस्ट केलेल्या नागरिकांना त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वीच थेट गावात सोडले. दुसरीकडे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप आमदारांच्या कोकण दौऱ्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यानी रेड झोनमधून आलेल्या भाजप आमदारांनी आधी स्वत: क्वारंन्टाइन व्हावे आणि मगच कोकणात फिरावे अन्यथा कोकणात कोरोना फैलावाचा धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

त्याला उत्तर देताना दरेकर यांनी राज्यात दौरे करणाऱ्या गृहमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना आधी क्वारन्टाइन करा, मगच भाजपाविषयी बोला, असं सामंत यांना सुनावलं आहे.

त्यामुळे कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार कोकणातल्या कोरोना टेस्ट लॅबसाठी प्रत्येकी वीस लाख रुपये द्यायला तयार आहोत.

पण लॅब सुरु करुन दाखवा, असं जाहीर आव्हानही भाजपने सरकारला दिलं आहे. सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांचे प्रमाण पाहता कोरोना चाचणी लॅब तातडीने उभारण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील हॉस्पिटलची मदत घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार प्रत्येकी वीस लाख रुपये या टेस्ट लॅब साठी देण्यास तयार आहोत सरकारने तातडीने लॅब सुरु करावी .

या प्रमुख मागण्या करत दरेकर यानी हे सरकार कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी झाल्याची टीका केली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button