Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अंतिम वर्षाच्या अंतीम सत्राच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा रद्द करू नये

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- पदवी परिक्षेच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मागील सेमिस्टरच्या अनुषंगाने अंतीम सत्रात ग्रेड देवून परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे व तसा प्रस्ताव मंजुरीसाठी युजीसी आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. या आपल्या प्रस्तावात राज्यातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर लढत असलेल्या संघटनांना सरकारने विचारात न घेता तसेच यांचे कुठलेही म्हणणे न ऐकता एकाएकी निर्णय घेतला आहे.

आमच्या विद्यार्थी संघटनेला अनेक होतकरू,गरीब, हुशार विद्यार्थी संपर्क करून सरकारच्या या निर्णया विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. तरी शासनाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या पदवी व पदव्युतर परीक्षा रद्द करु नये अशा मागणीचे निवेदन एमआयएम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज तांबोळी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना पाठविले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, देशातील व राज्यातील कोरोनाचा हाहाकार लक्षात घेता आपण हे पाऊल उचलले आहे त्याबाबत आमचे म्हणणे नाही परंतु ज्या विद्यार्थ्यास पदवीच्या पाचव्या सेमिस्टरला व पोस्ट ग्रॅज्युअशनच्या तिसर्‍या सेमिस्टरला आजारपणामुळे, किंवा इतर वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहता आले नाही किंवा अन्य कारणामुळे कमी टक्केवारी आली तर ग्रेडनुसार अंतीम निकाल देवून त्याला पास करणे हा त्या विद्यार्थ्यावर अन्याय असेल.

शासनाकडून विद्यार्थ्याला ग्रेड नुसार उत्तीर्ण करतांना त्याला इंटरलनल असेसमेंट चे 50 गुण मागील वर्षीचे किंवा सेमिस्टरचे 50 गुण यावरून त्या विद्यार्थ्याला ग्रेड दिले जाणार आहे. यातील इंटरनल अ‍ॅसेसमेंट, उपस्थिती, लॅब मॅन्युल, सबमिशन्स, गेस्ट लेक्चर उपस्थिती, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, वागणूक, शिक्षकांसोबतची वागणूक,

पहिली घटक चाचणीचे गुण, अभ्यासक्रम क्रियाकलाप इत्यादी बाबींवर असणार आहे हया मध्ये एखाद्या विद्यार्थाला आजारपणामुळे उपस्थित राहता आले नाही, काही कारणामुळे त्याचे सबमिशन्स अपूर्ण राहिले असेल, काही कारणामुळे कुठल्या लेक्चरला उपस्थित राहता आले नाही, काही इजा किंवा आजारपणाने स्पर्धेत सहभाग नोंदवता आला नसेल.

बॅकलोग मधे विषय राहिले असतील तर त्याला पुढील सेमिस्टर मधे प्रवेश तर मिळेल परंतु त्या विद्यार्थ्याला अंतीम सेमिस्टरलाच चौथ्या आणि पाचव्या सेमिस्टरचे पेपर द्यावे लागतील आणि हयाचे खुप मोठे दडपण त्या विद्यार्थ्यांवर येईल. आणि वरील या बाबीवरून त्या विद्यार्थ्याला ग्रेड मिळणार असतील तर त्याच्या सोबत अन्याय होईल

व या गोष्टींचा त्यांच्या भविष्यावर व पुढील शैक्षणिक जीवणावर परिणाम होईल याची काळजी सरकारने घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी जी फि भरली आहे ती त्यांना परत मिळणार का? या सारख्या असंख्य समस्यांसाठी आपण जाहीर आव्हानाव्दारे विद्यार्थांचे मत जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावेत व अंतीम वर्षांच्या परिक्षा रद्द करण्यात येऊ नये यासाठी योजना आखावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.