Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

मेंदूचा थकवा घालवायचाय? करा ‘या’ गोष्टीं

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव आणि टेन्शन या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. परंतु याच्या अतिरिक्त परिणामाने मेंदू अनेकदा थकतो. आणि हे असह्य झाले की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता.

यातून अनेकदा दुर्घटनाही घडू शकतात. किंवा व्यक्ती व्यसनाच्या आहारीही जाऊ शकते. यासाठी मेंदूला सतत ऊर्जा देण्यासाठी आणि आनंदी तसेच ताजेतवाने ठेवण्यासाठी काही उपाय करण गरजेचे असते.

१) शब्दकोडी सोडवण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या प्रकारची पझल्स आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. किंवा पेपरमध्येही येत असतात.

हे पझल्स सोडवणे हा डोक्यासाठी एक उत्तम आराम असू शकतो. यामुळे थकलेल्या मेंदूला वेगळ्या प्रकारचे खाद्य मिळते. मेंदू नव्याने तरतरीत होतो आणि त्याला चालना मिळते.

२) झोप आरोग्याच्या बहुतांश तक्रारींवर वेळेवर आणि पुरेसे झोपणे अतिशय आवश्यक असते. मेंदूसाठीही झोप पूर्ण होणे उपयुक्त ठरते. तुमची झोप पूर्ण झाली असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

तसेच यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास आणि विचार करण्याची क्षमता वाढण्यासही मदत होते. मेंदू शांत आणि ताजातवाना राहण्यासाठी पुरेशी झोप हा उत्तम उपाय आहे.

३) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय स्मरणशक्ती चांगली असेल तर त्याचा आपल्याला अनेक ठिकाणी फायदा होतो. मात्र मेंदू थकल्याने आपली स्मरणशक्ती कमी होत जाते. अशावेळी स्मरणशक्तीचे काही व्यायाम करणे म्हणजेच खेळ खेळणे नक्कीच उपयुक्त ठरु शकते.

अगदी लहान आणि सोप्या खेळांपासून तुम्ही सुरुवात करु शकता. हे खेळ तुम्ही एकटे, कुटुंबिय किंवा मित्रमैत्रीणी कोणासोबतही खेळू शकता.

त्यामुळे मेंदूला एकप्रकारचा व्यायाम होतो आणि तो नव्या दमाने काम करण्यास तयार होतो. आवडत्या व्यक्तींना किंवा हरहुन्नरी व्यक्तींना भेटणे दैनंदिन जीवनात आपण ठराविक लोकांनाच रोज भेटत असतो.

त्याच लोकांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून काहीवेळा कंटाळवाणे वाटू शकते. अशावेळी वेगळ्या क्षेत्रातील, वेगळ्या पद्धतीच्या लोकांना भेटणे उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे मेंदूची ऊर्जा वाढण्यास आणि तो अॅक्टीव्ह राहण्यास मदत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.