अभिनेते अनिल कपूर यांची ‘अशी’ आहे भन्नाट लव्हस्टोरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई बॉलिवूड वर आपल्या आवाजाने आणि अभिनयाने अधिराज्य गाजवणारे अभिनेते अनिल कपूर यांची १९ मे ला मॅरेज अँनिव्हर्सरी होती.

या निमित्ताने त्यांनी त्यांची व त्यांच्या पत्नी सुनीता कपूर यांची केमिस्ट्री कशी जुळली अर्थात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती दिली. ते म्हणतात, त्यांच्यासाठी वेडिंग अॅनिव्हर्सरीपेक्षा प्रपोजल अॅनिव्हर्सरी अधिक महत्वाची आहे.

आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरीसोबतच प्रपोज केलेला दिवस प्रपोजल अॅनिव्हर्सरी म्हणून साजरा करतो अनिल कपूर म्हणतात, 17 मे ही तारीख फार महत्त्वाची आहे.

कारण त्या रात्रीपासून त्यांच्या लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. ते म्हणतात, 17 मे रोजी मी एक मोठ्या प्रोजेक्टचा चित्रपट साइन केला होता.

आणि दुसऱ्याच दिवशी 18 मे रोजी सुनिताला लग्नाची मागणी घातली होती. हे दोन्ही दिवस माझ्यासाठी आनंदाचे होते, मात्र तितकेच पेचात पाडणारेही होते. कारण मी एक एक पावलं पुढे चालत होतो,

परंतु असा एक क्षण आला जेथे मला प्रेम किंवा करिअर या दोघांपैकी एकाची निवड करायची होती. मात्र मी माझ्या प्रेमाची निवड केली, असं अनिल कपूर यामध्ये म्हणतात.

अनिल कपूर यांचा फिटनेस आणि चेहऱ्यावरील हसू तरुणांना लाजवेल असंच आहे. जबरदस्त अभिनय, काम करण्याची जिद्द याच्या बळावर त्यांनी एक वेगळी ओळख बनवली आहे.

आजही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र एक काळ असा होता जेव्हा त्यांना अभिनय किंवा प्रेम या दोघांपैकी एकच गोष्टी निवडायची होती.

या कठीण प्रसंगामध्ये अनिल कपूर ठाम राहिले आणि त्यांनी एक अचूक निर्णय घेतला, ज्यामुळे आज त्यांच्यासोबत अभिनय आणि त्यांचं प्रेम अर्थात पत्नी सुनिता कपूरदेखील आहेत.

Leave a Comment